Click here to go back
भेट ऋणानुबंधाची
Image of a calender
Oct 22, 2021
Logo of a Customer
गायत्री कल्याणी
Image of a man working on his laptop

लहानपणापासून आपण शिकत आलो आहोत की अनोळखी माणसांशी बोलायच नाही... पण नीट विचार केला तर आपल्या लक्षात येतं की आता आपले जे मित्र-मैत्रीणी आहेत ते सुद्धा एकेकाळी अनोळखी होते. पण आता हेच अनोळखी लोक इतके जवळचे झालेले असतात की त्यांच्याशी बोलल्याशिवाय आपला दिवसच पूर्ण होत नाही. तस बघितलं तर आपले अनेक मित्र-मैत्रीणी असतात पण त्यातले काहीच, अगदी एक-दोन असतात जे आपले खास मित्र-मैत्रीणी असतात, ज्यांना आपण "बेस्ट- फ्रेंड्स" म्हणतो. हा शब्द ऐकताच प्रत्येकाला आपले बेस्ट फ्रेंड्स आठवतात. Just imagine की ह्या Best Friend नावाच्या प्राण्यांशिवाय आपले आयुष्य किती बेरंग असते. हा Best Friend नावाचा प्राणी फक्त एक खास मित्र किंवा मैत्रीण नसून एक भावना आहे. देवाने प्रत्येकाला दिलेली एक देणगीच जणू. प्रत्येक सुखाच्या प्रसंगी आणि अगदी वाईटातल्या वाईट प्रसंगी हिच काही माणसं असतात जी आपल्या बरोबर असतात.

आपल्या आयुष्यात एखादी चांगली गोष्ट घडली तर आपण पटकन पहिल्यांदा आपल्या आई-वडिलांना, आजी-आजोबांना , मामा-मामीला, मावशी या सगळ्या कुटुंबातल्यांना फोन करतो पण जेव्हा एखादी अत्यंत दुःखद घटना घडते तेव्हा पहिल्यांदा आपण फोन करतो तो आपल्या Best friend लाच; कारण आपल्याला माहित असतं की कोणत्याही प्रसंगी हाच/हीच आपल्याला आधार देईल आणि हा जगातील एकमेव असा नालायक प्राणी असतो जो कीतीही वाईट प्रसंग असला तरी आपल्याला हसवतोच.

2020 मध्ये संपूर्ण जगावरच कोरोनाच संकट आलं. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस सगळंच online झालं. अशा काळातही आपल्याला अशा अनोळखी व्यक्ती भेटल्या की ज्या आता आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटकच बनल्या आहेत. ते म्हणतात ना, 'आपल्या नशीबात काही भेटी लिहिलेल्या असतात ज्या आपल आयुष्य बदलून टाकतात’. ह्या online मैत्रीचा प्रवास चालू होतो तो whatsapp वर. पहिल्यांदा काही Hi, Hello चे मेसेजेस, मग थोड्या दिवसांनी दोन-दोन, तीन-तीन तास chatting आणि मग Google meet आणि मग रात्री 2-3 वाजेपर्यंतच्या गप्पा.

Online बोलतानाच इतकी मज्जा येत असते तर Offline प्रत्यक्षात भेटलो तर काय होईल! हा experience अगदीच कमी लोकांना मिळतो पण हा life time experience असतो. आपले Online best friends जेव्हा प्रत्यक्षात आपल्या समोर उभे असतात तेव्हा दोनच शब्द मनात येतात, ते म्हणजे ' भेट ऋणानुबंधाची '. ह्या क्षणी सगळ्या गोष्टी आठवतात. ह्या प्राण्याला आपण कसे भेटलो, पाहिला message, पहिल्या गप्पा आणि मग मैत्रीचा सगळा प्रवास एका क्षणात डोळ्यासमोर येतो. तेव्हा विश्वासच बसत नाही की ही माणसं एकेकाळी पूर्णपणे अनोळखी होती. अस वाटत की अरे ह्यांना तर आपण लहानपणापासून ओळखतो. आपण स्वतःला जितके ओळखतो त्याच्याहून जास्त हे आपल्याला ओळखतात. आपल्या आवाजातील छोटासा बदलही आपल्या Best Friend ला कळतो. कधी कधी अस वाटतं की जशा लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जातात तशाच मैत्रीच्या गाठीही तिथेच बांधल्या जात असाव्यात.